सरोगसी दोन प्रकारे करण्यात येते:
१.सरोगेट माता तिचे स्त्रीबीज देते-
या स्थितीत सरोगेट मातेशी मूल हवे असलेल्या जोडप्यातील पुरुषाचा संबंध जाणिवपुर्वक अथवा कृत्रिमपद्धतीने घडवून गर्भधारणा करण्यात येते.या पद्धतीला पांरपारिक सरोगसी असे म्हणतात.मात्र या पद्धती मध्ये त्या जोडप्यातील स्त्रीचा होणा-या बाळाशी कोणताही अनुवंशिक सबंध राहत नाही.जगभरात असे संबंध बेकायदेशीर मानले जातात.
२.मूल हवे असलेल्या स्त्रीचे स्त्रीबीज वापरण्यात येते-
या बाळ हवे असलेल्या स्त्रीचे स्त्रीबीज व तिच्या नव-याचे शुक्राणू यांचे आयव्हीएफ या पद्धतीने मिलन घडवून तो गर्भ सरोगेट मातेच्या गर्भाशयात सोडण्यात येतो अथवा त्यास्त्रीचे स्त्रीबीज व तिच्या नव-याचे शूक्राणू जीआयएफटी Gamete Intra-Fallopian Transfer या पद्धतीने सरोगेट मातेच्या गर्भाशयात सोडण्यात येतात त्यामुळे सरोगेट मातेच्या गर्भाशयात गर्भधारणा होते.नऊ महिने ती सरोगेट माता बाळाचे तिच्या गर्भाशयात संगोपन करते.अशा वेळी काही कारणात्सव जर मूल हवे असलेल्या स्त्रीचे स्त्रीबीज वापरणे शक्य नसेल तर एग डोनरकडून स्त्रीबीज घेण्यात येतात.